जाणून घ्या न्यायाधीश कलिफुल्ला यांच्याबद्दल, जे करणार आहेत अयोध्या वादात मध्यस्थी

kalifulla
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपल्या निर्णयात अयोध्या-बाबरी वादावर मध्यस्थी काढण्यासाठी एक त्रिसदस्यी समितीची नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त न्यायाधीश एफएम इब्राहिम कलिफुल्ला, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ राम पंचू यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फैजाबादमधील बंद खोलीत कॅमेऱ्यासमोर मध्यस्थीची संपूर्ण प्रक्रिया पुर्ण होईल. याचा अर्थ असा आहे की त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल आणि मीडियाला त्याच्या कव्हरेजपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राम जन्मभूमि-बाबरी मस्जिद प्रकरणात मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालायने निवृत्त न्यायाधीश एफएम इब्राहिम कलिफुल्ला यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. समितित न्यायाधीश कलिफुल्ला यांच्या सर्वात मोठी जवाबदारी असणार आहे.

  • जाणू घेऊ न्यायाधीश कलिफुल्ला यांच्याबद्दल
    – न्यायाधीश कलिफुल्ला यांचा जन्म 23 जुलै 1951 रोजी तामिळनाडुच्या शिवंगाई जिल्ह्यातील कराईकुडी येथे झाला.
    – त्याचे पूर्ण नाव फकीर मोहम्मद इब्राहिम कलिफुल्ला आहे.
    – न्यायाधीश कलिफुल्ला 20 ऑगस्ट 1975 रोजी वकील म्हणून नामांकित करण्यात आले, त्यानंतर त्यांनी टी. एस. गोपाल आणि कंपनी लॉ फर्ममधील कामगार कायद्याचा अभ्यास सुरु केला.
    – ते 2 मार्च 2000 रोजी मद्रास उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते.
    – फेब्रुवारी 2011 मध्ये ते जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे सदस्य बनले आणि दोन महिन्यांनंतर कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले.
    – सप्टेंबर 2011 मध्ये त्यांना जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले.
    – एप्रिल -2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि मुख्य न्यायाधीश सरोज होमी कपडिया यांनी त्यांना शपथ दिली.
    – भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) पारदर्शी बनविण्याच्या प्रक्रियेत त्यांनी न्यायमूर्ती लोढा यांच्यासोबत काम केले.
    – न्यायाधीश कलिफुल्ला 22 जुलै 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले.

Leave a Comment