१४ राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाची नोटीस

election
मुंबई – काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह १४ पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. १० मार्च २०१९ पर्यंत खर्चाचा तपशील सादर करण्याचे या मान्यताप्राप्त १४ राजकीय पक्षांना कळविण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या १५ ऑक्टोबर २०१६ च्या आदेशान्वये निवडणूक खर्च सादर करणे राजकीय पक्षांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासंदर्भात राजकीय पक्षांना वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून अवगतही करण्यात आल्यामुळे आपली नोंदणी रदद् का करण्यात येऊ नये, अशी नोटीस आता बजावण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आणि जनता दल (युनायटेड) या राजकीय पक्षांना नोटीस बजावली आहे.

Leave a Comment