पुण्यातील 45 पाकिस्तानी हिंदू झाले भारतीय

indian
पुणे – पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या एरियल स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असतानाच पुण्यातील 45 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. त्यांना पाकिस्तानात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे ते बऱ्याच वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होते. त्यांना अनेक प्रयत्नांनंतर मिळालेल्या भारतीय असल्याचा दाखला मिळल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पाकिस्तानात हिंदू समाजाची अल्पसंख्याकांमध्ये गणती होते. आम्ही अल्पसंख्यांक असल्यामुळे पाकिस्तानात आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आम्ही भारतात आलो आणि आम्हाला भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी प्रयत्न करत होतो. सरतेशेवटी आमच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आम्हाला अत्यानंद होत असल्याचे या नागरिकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

या सर्वांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कायदेशीररित्या भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. सर्वांनी भारताचे नागरिकत्व मिळाल्याने समाधान व्यक्त केल आहे. हे ४५ जण पाकिस्तानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे भितीपोटी आणि काम-धंद्यानिमित्त सुमारे अनेक वर्षांपासून पुणे शहरात वास्तव्याला आहेत. मात्र, त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नव्हते. मात्र, ते मिळावे यासाठी त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर या सर्वांची मूळ कागदपत्रे तपासून त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले.

Leave a Comment