दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला झाला आहे गुप्तरोग

digvijay-singh
भोपाळ – काँग्रेस नेते दिग्विजय सिंह काही दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये जम्मू- काश्मिरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा ‘दुर्घटना’ असा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपच्या नेत्याने बेताल वक्तव्य केले आहे. भाजप नेत्याने त्यांच्यावर टीका करताना दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून भारताविरोधात वक्तव्य केल्याशिवाय त्यांना जेवण जात नसल्याचे म्हटले आहे.

जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी दुर्घटना असा केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा दाखला देत मध्य प्रदेशमधील भाजप नेते गोपाल भार्गव यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली. पण टीका करताना भार्गव यांची जीभ घसरली. भार्गव यांनी दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून ते जोपर्यंत मोबाईलवर बोटे चालवत नाही आणि तोंडातून भारताविरोधात गरळ ओकत नाहीत वक्तव्य करत नाही, तोपर्यंत त्यांना जेवणच जात नसल्याचे म्हटले आहे. नाही, असे भार्गव यांनी म्हटले आहे.

Leave a Comment