माध्यमातून प्रसिद्ध झाली हवाई दलाच्या एरियल स्ट्राईकची छायाचित्रे

aerial-strike
नवी दिल्ली – सध्याच्या घडीला देशात हवाई दलाने पाकिस्तानात केलेल्या एरियल स्ट्राईकवरुन जोरदार राजकारण सुरु असून त्यातच पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागितले जात आहेत. किती दहशतवादी भारताने केलेल्या या हल्ल्यात मारले गेले आहेत याची देखील विचारणा होत आहे. यासंबंधातील काही सॅटेलाईट छायाचित्रे आता समोर आली असून इतर माध्यमांमधून आलेल्या अहवालात ही छायाचित्रे समोर आली आहेत. ही छायाचित्रे ‘जैश’च्या तळांवर हल्ला केल्यानंतरची असून या छायाचित्रांमध्ये याठिकाणी काहीच उद्ध्वस्त झालेले दिसत नाही.

सरकारला भारतीय हवाई दलानेही काही छायाचित्रे सादर केली आहेत. ज्यात स्पाईस २००० ग्लाईड बॉम्ब ५ इमारतींवर टाकल्याचा परिणाम दिसून येत आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. सीआरपीफच्या ४० जवानांना यात वीरमरण आले होते. भारताने यानंतर पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला केला. यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांबाबत पुरावे मागायला सुरुवात झाली. अनेकांनी सरकारला याबाबत विचारणा केली.

Leave a Comment