सुखोई ३० एमकेआय मध्ये इस्त्रायली बॉम्बचा होणार वापर

su30
भारतीय हवाई दलाने अधिक शक्तिशाली बनण्यासाठीच्या प्रक्रियेला वेग दिला असून दीर्घ पल्ला गाठून बॉम्बफेक करू शकणाऱ्या सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानात इस्त्रायलचे स्पाईस २००० लेझर गायडेड बॉम्ब वापरण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. सध्या मिराज २००० मध्ये असेच बॉम्ब वापरले जात आहेत. पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळांवर हल्ले चढविताना हे आणि भारतीय सुदर्शन लेझर गायडेड बॉम्ब वापरले गेले होते.

ही विमाने पहाटेच्या धूसर प्रकाशातही तसेच रात्रीही अचूक बॉम्बफेक करू शकतात. बालाकोट हल्ल्यानंतर माहिती देताना परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी हल्ल्यांची पुष्टी केली त्यावेळे पासून मिराज मधून कोणती शस्त्रे नेली गेली या चर्चेला तोंड फुटले होते. इस्त्रायली फर्म राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टीम लिमिटेड स्पाईस २००० या लेजर गायडेड बॉम्बची उत्पादक आहे. सुखोई विमानांचा पल्ला दीर्घ असून ही विमाने शत्रूही फळी मोडून काढणे, शत्रूची एकाग्रता नष्ट करणे यासाठी अति उपयुक्त आहेत शिवाय त्यातून लेझर गायडेड टाईपचे २६ बॉम्ब नेता येतात.

Leave a Comment