संध्या मारवा- पहिली महिला रेल्वे कुली

sandhya
जगभरात ८ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलेकडे असलेली मातृशक्ती सर्वात मोठी शक्ती आहे आणि त्याचे उत्तम उदाहरण आहे मध्यप्रदेशातील संध्या मारवा. पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता तीन मुले आणि सासूची जबाबदारी खांद्यावर घेणारी संध्या देशातील पहिली महिला रेल्वे कुली आहे. प्रपंचात आलेल्या संकटांचा सामना महिला नेहमीच जिद्दीने करतात. मग त्या श्रीमंत घरातील असोत वा गरीब घरातील. त्यातही गरीब महिलांसाठी हा संघर्ष अधिक तीव्र बनतो पण संध्या सारखी गरीब घरातील महिला अनेकांसाठी प्रेरणास्थान बनू शकते.

kulie
संध्याच्या पदरी दोन लहान मुले आणि एक मुलगी आहे आणि सासू आहे. संध्याने पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाह करण्यासाठी रेल्वे कुली बनण्याचा निर्णय घेतला. ती जबलपूर पासून रोज ४५ किमीचा प्रवास करून कटणी रेल्वेस्टेशनवर सकाळीच पोहोचते आणि दिवसभर हमाली करून रात्री घरी परतते. ३० वर्षीय संध्याच्या पतीचे २०१६ मध्ये निधन झाले आहे. त्यावेळी तिची मुले ४ ते ८ वर्षाची होती. मात्र संध्याने हिम्मत हारली नाही. मुलांना चांगले शिक्षण द्यायचे या इच्छेने तिने हमाली करण्याचा मार्ग निवडला. कटनी स्टेशनवर ४० नोंदणीकृत कुली आहेत त्यात संध्या एकटीच महिला आहे. तिचा कुली नंबर आहे ३०.

संध्यासाठी रोजचा १०० किमीचा प्रवास आणि घरकाम थोडे धकाधकीचे आहे. त्यामुळे तिने जबलपूर स्टेशनवर बदली मिळावी यासाठी विनंती केली आहे मात्र ती अजून मान्य झालेली नाही.

Leave a Comment