या वर्षाखेर भारतात ६२.७ कोटी इंटरनेट युझर

users
कंतर आयएमआरबी या मार्केट रिसर्च कंपनीने जाहीर केलेल्या निरीक्षणानुसार भारतात या वर्षअखेर इंटरनेट युजरची संख्या ६२.७ कोटींवर जाणार असून त्यात ग्रामीण भागाचा मोठा वाटा आहे. २०१८ मध्ये हि संख्या ५६.६ कोटी होती त्यात या वर्षात ११ टक्के वाढ होत आहे. बिहार मध्ये ही वाढ ३५ टक्के असून देशात या बाबतीत बिहार आघाडीवर आहे. विशेष म्हणजे महिला युजरच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसली असून देशात महिला युजरचे प्रमाण ४२ टक्क्यांवर गेले आहे.

शहरी भागात ही वाढ ७ टक्के असेल आणि ग्रामीण भागात ती ३५ टक्के असेल असा अंदाज आहे. शहरात २०१८ मध्ये ३१.५ कोटी इंटरनेट युजर तर ग्रामीण भागात २५.१ कोटी युजर होते ते २०१९ च्या अखेरी ग्रामीण भागातील युजर संख्या २९ कोटींवर जाईल असा अंदाज आहे. या संस्थेचे अधिकारी हेमंत मेहता म्हणाले, डिजिटल क्रांतीचा फैलाव छोट्या शहरातून, खेडी, गावातून झपाट्याने होत असून यामागे कमी झालेले इंटरनेट डेटा दर कारणीभूत आहेत. जगात इंटरनेट दर भारतात सर्वाधिक स्वस्त आहेत.

Leave a Comment