इराकमध्ये वाढते आहे कबुतर रेसची क्रेझ

peagon2
कोंबड्यांच्या झुंजी, बैल, ससाणे यांच्या शर्यती, रेड्यांच्या झुंजी यासंदर्भात आपण अनेकदा ऐकतो. इराक मध्ये कबुतरांच्या रेस अतिशय लोकप्रिय होत असून या रेसची क्रेझ तेथे निर्माण झाली आहे. नोव्हेंबर ते मार्च या काळात या रेस होतात. इराकमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या कबुतर रेस जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित मानल्या जातात. रेसच्या लोकप्रियतेत वाढ होत असल्याने कबुतरांच अपहरण, खंडणी सारख्या गुन्ह्यात वाढ झालेली दिसून येत आहे.

peagon
बगदाद पासून १०० मैलावर असलेल्या मोठ्या मैदानात या रेस होतात. यंदाच्या रेस मध्ये १४ हजार कबुतरे सामील झाली असून १२ ट्रक मधून ही कबुतरे येथे आणली गेली. सूर्याचे पहिले किरण जमिनीवर आले कि ही रेस सुरु होते आणि एकाचवेळी १४ हजार कबुतरांचे २८ हजार पंख फडफडू लागतात. त्यामुळे हवेचा प्रचंड झोत निर्माण होतो. या कबुतरांना या रेस साठी ६ महिने प्रशिक्षण दिले जाते. रेसवर लोक हजारो डॉलर्सची रक्कम लावतात.

peagon4
कबुतर मालकांसाठी त्यांची कबुतरे अभिमान आणि प्रतिष्ठेचा विषय असतात. युरोपीय जातीची ही कबुतरे ६०० मैल उडू शकतात आणि त्यांचा वेग ताशी ९० मैलांपर्यंत असतप. या कबुतरांना महिन्याला १०० डॉलर्स किमतीचा पौष्टिक खुराक दिला जातो आणि जिंकणाऱ्या कबुतरांना ३ लाखांपर्यंत किंमत मिळते. काही दिवसापूर्वी बसरा येथे एका कबुतराला ९३ हजार डॉलर्स म्हणजे सुमारे ६६ लाख रुपये किंमत मिळाली होती.

peagon1
इराकमध्ये अनेक लोक नोकरी सोडून कबुतर प्रशिक्षण व्यवसाय करत आहेत. अनेकदा रेस मधली कबुतरे उडताना जाळ्यात पकडून त्यांचे अपहरण केले जाते व त्याच्या बदली खंडणी मागितली जाते. मालक कबुतराला इजा होऊ नये म्हणून त्यांचे फोन नंबर कबुतरांच्या पायाला बांधून ठेवतात म्हणजे खंडणी मागणारा कबुतराला अपाय न करता मालकाला फोन करून खंडणी वसूल करतो.

रेसमध्ये विजयी कबुतराला १०० किंवा २०० डॉलर्स बक्षीस म्हणून दिले जातात. मात्र हे मालक खरा पैसा मिळवितात तो या रेस विजेत्या कबुतरांच्या ब्रीडिंग मधून. ब्रीडिंग साठी ही कबुतरे प्रचंड रकमांना विकली जातात.
————

Leave a Comment