अजबच : एक मच्छर जेट को लेट करता है

jet-airways
विमानाच्या उड्डाणात होणारा उशीर हा आपल्यासाठी काही नवीन नाही. पण त्यातच मुंबईवरुन दिल्लीला जाणारे जेट एअरवेजच्या विमानाचे बुधवारी एक तास उशीरा उड्डाण झाले. पण या उड्डाणाला उशीर का झाला यामागचे कारण अजबच आहे. या विमानाच्या उड्डाणाला चक्क मच्छरांमुळे उशीर झाला.

मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी बुधवारी सकाळी सहा वाजता जेट एअरवेजच्या 9W 762 हे विमानाचे उड्डाण होणे अपेक्षित होते. प्रवाशांना पहाटे पाचच्या सुमारास विमानात चेक इन करण्यास सुरूवात झाली. पण विमानाच्या दरवाजातच मच्छरांच्या घोळक्याने प्रवाशांचे स्वागत केलं. सगळे प्रवाशी आतमध्ये ठीक असेल असा विचार करून आपापल्या जागेवर बसले पण विमानाच्या आतमध्येही मच्छरांचा सुळसुळाट होता.

याबाबत प्रवाशांनी तक्रार केली असता केबिन क्रूने मच्छर घालवण्यासाठी बेगॉन फवारले. पण मच्छरांना त्याचा काही पडला नाही. सरते शेवटी जेटचे कर्मचारी मच्छर मारायचे रॅकेट घेऊन आले. त्यांनी संपूर्ण विमानात रॅकेट फिरवत मच्छरांना पिटळण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला. या सगळ्या गडबडीत विमानाचे उड्डाण तब्बल एक तास उशीराने झाले.

Leave a Comment