धूळ खात पडलेल्या पेन्टिंगला 400 वर्षानंतर लिलावात मिळणार तब्बल 1200 कोटी रुपये!

painting
पॅरिस – जगातील सर्वात लोकप्रिय चित्रकारांपैकी एक मायकल एंजेलो यांची 400 वर्षे जुनी ‘ज्यूडिथ अॅन्ड होलोफेरनेस’ नावाची पेन्टिंग सापडली असून या पेन्टिंगचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. तज्ञांच्या मते, 1607 बनवली मायकल यांनी होती. या पेन्टिंगला येत्या 27 जून रोजी होणाऱ्या एका लिलावात 17 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 1200 कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. ही पेन्टिंग मायकल एंजेलो यांनी तयार केल्याच्या अवघ्या काही दिवसांतच बेपत्ता झाली होती.

ही पेन्टिंग फ्रान्समध्ये लिलाव आयोजित करणारे मार्क लबार्ब यांना त्यांच्या घरात नुकतीच सापडली. ही कलाकृती ऐवढी मौल्यवान असेल याची त्यांना माहितीच नसल्यामुळे ती गेल्या कित्येक दिवसांपासून एका जुन्या स्टोअर रुममध्ये धूळ खात पडली होती. ही पेन्टिंग मार्क यांनी जेव्हा पेन्टिंग आर्ट एक्सपर्ट एरिक तुर्किन यांना दाखवली तेव्हा त्यांना धक्काच बसला. एरिक यांनी या पेन्टिंगसोबत दोन पत्र सुद्धा शोधून काढले. हे दोन्ही पत्र इटलीच्या मनतुआ राज्यातील राजा ड्यू ऑफ मनतुआ यांच्या नावे लिहिण्यात आले होते. त्यामध्ये पेन्टिंगचा संपूर्ण तपशील होता. सोबतच, ही कुठे तयार झाली, कुणी बनवली आणि याची कॉपी कुणाकडे आहे ही सर्व माहिती देण्यात आली होती.

ही पेन्टिंग 2014 साली मार्क लबार्ब यांना सापडली होती. पण त्याची माहिती एरिक तुर्कीन यांनी सरकारला दिली नाही. ही कलाकृती दोन वर्षे त्यांनी आपल्या बेडरुममध्ये लपवून ठेवली होती. पहिल्यांदाच पेन्टिंगची माहिती 2016 मध्ये फ्रान्स सरकारला देण्यात आली. पेन्टिंग तपासण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रिय लूवर म्युझियमच्या तज्ज्ञांनी एरिक यांचे घर गाठल्यानंतर ती विकत घेण्यास लूवर म्युझियमने नकार दिला. अनेक तज्ज्ञांनी असाही दावा केला की या पेन्टिंगची किंमत एवढी आहे की लूवर म्युझियमच्या 4 वर्षांच्या व्यवस्थापनाचा खर्च भागवला जाऊ शकतो.

Leave a Comment