तुम्ही पाहिले आहे का इनोव्हाचे लाऊंज अल्टीमेट एडिशन…

innova
टोयोटाची इनोव्हा क्रिस्टाला इंडियन कार मॉडिफाई कंपनी DC डिझाइनने मॉडिफाईड केले असून या कारचे इंटेरियर मॉडिफिकेशननंतर पूर्णपणे चेंज झाले आहे. या मॉडिफाईड मॉडेलला कंपनीने ‘लाऊंज अल्टीमेट एडिशन’ असे नाव दिले आहे. ड्राइव्हर सीट आणि बॅक सीटमध्ये कम्प्लीट पार्टिशन देण्यात आले आहे. 2 पॅसेंजर्ससाठी बॅक केबिनमध्ये 24 इंचाच्या कॅप्टन सीट्‍स बसविण्यात आल्या आहेत.
innova1
मॉडिफाईड इनोव्हामध्ये कॅबिन तयार करण्यात आला आहे. 24 इंचाच्या कॅप्टन सीट बसविण्यात आल्या आहेत. 150 डिग्रीपर्यंत सीट्‍स वाकू शकतात. ‍सीट्‍स पूर्णपणे कम्फर्टेबल आहेत. सोबतच 20 इंचाचा LED TV देण्यात आला आहे. सोबत DVD प्लेअर आहे. कारमध्ये 7 लीटरचा मिनी फ्रिज देखील बसविण्यात आला आहे. कारला आतून LED लाइट्सने फिनिशिंग देण्यात आले आहे. कॅबिनमध्ये बसलेल्या पॅसेंजर्सला ड्राइव्हरशी संवाद साधण्‍यासाठी माईकचा वापर करावा लागतो. फूडसाठी दोन्ही पॅसेंजर्ससमोर ट्रे बसविले आहेत.
innova2
कारच्या इंजिनमध्ये DC डिझाइन कोणताही बदल करत नाही. 2694cc चे पॉवरफूल इंजिन टोयोटा इनोव्हा क्रिस्टामध्ये आहे. 6 स्पीड गिअर बॉक्स ट्रान्समिशन देण्यात आले आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या पेट्रोल व्हेरिएंटची दिल्ली एक्स-शोरूम प्राईज 14.83 लाख रुपये आहे. मॉडिफिकेशनसाठी 5 लाख रुपये खर्च येतो.

Leave a Comment