लाँच झाले वन नेशन वन कार्ड

onenaton
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वन नेशन वन कार्ड सेवा सुरु करण्यात आली असून या कार्डचा वापर नागरिक सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी करू शकणार आहेत. त्याचबरोबर अन्य अनेक प्रकारच्या सेवा या कार्डवर मिळणार आहेत. रूपे पॉवर्ड कार्ड आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रमाणे हे कार्ड आहे. जुन्या रूपे डेबिट क्रेडीट कार्ड प्रमाणे याचा वापर करता येणार असून भागीदार बँका हे कार्ड त्यांच्या डेबिट, क्रेडीट, प्रीपेड कार्डच्या स्वरुपात नागरिकांना देऊ शकणार आहेत. पेटीएम पेमेंट बँक सुद्धा हे कार्ड देऊ शकणार आहे.

हे कार्ड पूर्णपणे कॉन्टॅक्ट लेस आहे. म्हणजे मेट्रो रेल स्मार्टकार्ड प्रमाणे त्याच्यावर होल्डरचे नाव अथवा डीटेल्स नाहीत. शॉपिंग सह बस, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, महामार्गावरील टोल, पार्किंग साठी ते वापरता येईल तसेच एटीएमवरही वापरता येईल. एटीएम मध्ये वापर केल्यास त्यावर ५ टक्के कॅशबॅक मिळेल तर परदेशी प्रवासदरम्यान त्याचा वापर मर्चंट औटलेटवर केल्यास १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. हे कार्ड डिस्कव्हर व डायनर्स क्लब इंटरनॅशनल मर्चंट शिवाय परदेशातील एटीएम वरही स्वीकारले जाणार आहे.

Leave a Comment