सर्वाधिक वयोवृद्ध योगा गुरु म्हणून ताओ यांची गिनीज बुकमध्ये नोंद

yoga
मुंबई : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ताओ पोर्शन यांच्या नावाची सर्वाधिक वयोवृद्ध योगा टिचर म्हणून नोंद झाली आहे. 100 वर्षीय ताओ रोज २ तास योगासने करतात. आतापर्यंत ताओचे अनेकदा ऑपरेशन्स झाली आहेत. आता योग करू शकणार नसल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले. पण त्यांनी डॉक्टरांचे भाकीत खोटे ठरवले आहे.

पाँडिचेरीमध्ये जन्मलेल्या ताओचा न्युयॉर्कमध्ये त्या एका योग संस्थेच्या संस्थापक असून ताओनं अमेरिकाज् गॉट टॅलेंट शोमध्ये २६ वर्षीय पार्टनरसोबत डान्स केला तेव्हा सर्वांनी तोंडात बोटे घातली होती. फक्त कला क्षेत्रच नाही तर सामाजिक क्षेत्रातही ताओ यांचे योगदान आहे. महात्मा गांधींसोबत दोन वेळा आंदोलनामध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. चौदाव्या दलाई लामांसोबत त्यांनी स्टेज शेअर केला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण ताओ यांनी वया्च्या पंचाहत्तराव्या वर्षापासून पाणी पिलेल्याच नाही. त्या फक्त ज्यूस पितात. पूर्णत: शाकाहारी भोजन त्या घेतात.

Leave a Comment