रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक रिलीज!!

akshay-kumar
रोहित शेट्टीने आपल्या ‘सिम्बा’ या चित्रपटात ‘सूर्यवंशी’या चित्रपटाची एक झलक दाखवली होती. ही झलक पाहिल्यानंतर ‘सूर्यवंशी’चे फर्स्ट लूक पाहण्यास प्रेक्षक उत्सूक झाली होते. तर आता ती प्रतीक्षाही संपली असून रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयसोबत रोहित पहिल्यांदा काम करत आहे. नुकताच रोहित व अक्षयच्या ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. ट्रेड एक्स्पर्ट गिरीश जौहर यांनी काही तासांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला.

अक्षय या अ‍ॅक्शन चित्रपटात एटीएस अधिकाऱ्याच्या भुमिकेत आपल्या समोर येणार आहे. अक्षयचे चित्रपटात सूर्यवंशी असे नाव असेल. चित्रपटात तो दहशतवादाविरोधात लढताना दिसेल. चित्रपटात अक्षयच्या अपोझिट कोण हिरोईन दिसणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटासाठी पूजा हेगडेचे नाव अक्षयने सुचवले असल्याची बातमी मध्यंतरी होती.


रोहित व अक्षयचा ‘सूर्यवंशी’ पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टीचा हा आगामी चित्रपट ‘सिम्बा’प्रमाणेच एका साऊथच्या चित्रपटाचा रिमेक असल्याचे मानले गेले होते. तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा होती. याआधीही रोहितने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले आहेत. पण ही बातमी ऐकताच रोहित प्रचंड संतापला होता. ‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटाचा रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. यावर दीर्घकाळापासून काम सुरु होते, असे त्याने यानंतर स्पष्ट केले होते.

Leave a Comment