पाककडून अद्याप हाफिज सईदच्या संघटनेवर बंदी नाही

hafeez-saeed
नवी दिल्ली – पाकिस्तानने एक आठवड्यापूर्वी हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानिअत फाऊंडेशनवर बंदी घालण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केली होती. पण ही घोषणा एक फसवी घोषणा असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण सईदच्या दहशतवादी संघटनांवर पाककडून अद्याप कोणत्याही प्रकारची बंदी घातली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबतची माहिती पाकिस्तान सरकारच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी प्राधिकरणाच्या (एनसीटीए) वेबसाईटवर देण्यात आली असून या माहितीनुसार, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या केवळ निरिक्षणाखाली सईदच्या या दहशतवादी संघटना असून त्याच्या संघटनेवर व त्याच्या अद्याप कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत या संघटनांच्या संपत्ती जप्तीचे आदेश पाकिस्तान सरकारने दिले होते.

संरक्षण मंत्रालयाच्या निरिक्षण यादीत हाफिजच्या संघटना केवळ अंतर्गत प्रकरणांसाठी आहे. जानेवारी २०१७ मध्ये निरिक्षण यादीत या संघटनांचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन हाफिजच्या दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याबाबत मोठा दबाव आल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सरकारने म्हटले होते की, त्यांनी जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इंसानिअत फाऊंडेशन या संघटनांवर बंदी घातली आहे.

Leave a Comment