अफजल गुरूच्या मुलाला मिळाले आधार कार्ड

afzal-guru
नवी दिल्ली – संसदेवर हल्ला केल्याच्या प्रकरणी फाशी झालेल्या अफजल गुरुच्या मुलाला आधार कार्ड मिळाले असून त्यावर प्रतिक्रिया देताना 18 वर्षीय गालिबने भारतीय आधार कार्ड मिळाल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. सध्या नीट परीक्षेच्या तयारीत गालिब असून त्याला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे.

दहशतवादी अफजल गुरूला संसदेवर हल्ला केल्या प्रकरणी सहा वर्षापूर्वी फाशीची शिक्षा दिली होती. आजोबा गुलाम मोहम्‍मद आणि आई तबस्‍सुमसोबत श्रीनगरजवळील गुलशनाबाद गावात गालिब राहत आहे. मला भारतीय आधार कार्ड मिळाल्याचा अभिमान आहे, मला आता पासपोर्ट मिळावा अशी इच्छा प्रसारमाध्यमांशी बोलताना गालिबने व्यक्त केली.

मी माझ्या वडिलांप्रमाणे दहशतवादाच्या मार्गावर कधीही जाणार नाही. मला दहशतवाद, काश्मीरच्या स्वातंत्र्यापेक्षा माझी आई महत्वाची आहे. काश्मीरबद्दल कोणी काहीही सांगितले, भडकावण्याचा प्रयत्न केला तर ऐकू नकोस, दहशतवादाच्या वाटेवर जाऊ नकोस, अशी सक्त ताकीदच मला आईने दिल्याचे गालिब म्हणाला.

Leave a Comment