महाराष्ट्र पोलिसातील अर्नोल्ड किशोर डांगे

dange
भारतात ज्या राज्यांची पोलीस दले मोठी आहेत त्यात महराष्ट्र पोलिसांचा समावेश आहे. सर्वसाधारण पोलीस दलात पोलिसांचा फिटनेस हा अनेकदा काळजीचा तर बरेच वेळा टीकेचा विषय आहे. मात्र पोलीस दलात नव्याने रुजू होत असलेले युवक फिटनेसबाबत अधिक दक्ष आहेत असे दिसते. याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले किशोर डांगे. डांगे पोलीस दलात अर्नोल्ड म्हणून प्रसिद्ध आहेत. ते बॉडीबिल्डर आहेत आणि देशविदेशात अनेक खिताबांचे मानकरीही. त्यांची बॉडी पाहून भल्या भल्या पैलवानांची बोटे तोंडात जातात.

kishor
किशोर डांगे यांनी मिस्टर महाराष्ट्र, मिस्टर मराठवाडा असे अनेक खिताब जिंकले आहेत शिवाय अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील स्पर्धेत त्यांनी रजत पदकाची कमाई केली आहे. किशोर डांगे यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अतिशय गरीब कुटुंबात जालना येथे ते वाढले पण सुरवातीपासून बॉडी बिल्डींगची आवड होती त्यामुळे त्यासाठी ते कसून सराव करत असत. अनेकदा आर्थिक अडचणीमुळे त्यांना सराव सोडवा लागायचा. पोलीस दलात भरती होण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले आहेत आणि एकदा पोलीस नोकरी मिळाल्यावर बॉडी बिल्डींगवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

किशोर डांगे पोलिसाच्या वर्दीत जेव्हा गल्ली बोळातून गस्तीवर असतात तेव्हा घराघरातून, खिडक्यातून लोक त्यांच्याकडे अचंब्याने पाहतात. किशोर यांचा महाराष्ट्र पोलिसांना अभिमान आहे आणि किशोर आमची प्रेरणा आहे असे पोलीस दलाचे सांगणे आहे.

Leave a Comment