पुलवामा येथील प्राचीन शिवमंदिराची मुस्लीम करतात देखभाल

payar
१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानाच्या ताफ्यावर दहशदवादी हल्ला होऊन ४५ जवान शहीद झाल्यानंतर देशविदेशात पुलवामा चर्चेत आले आहे. दक्षिण काश्मीर मधील हे गाव आणखी एका कारणासाठी ओळखले जाते. या गावात एक प्राचीन शिवमंदिर असून गेली अनेक वर्षे या मंदिर्वाची देखभाल एक मुस्लीम परिवार करत आहे. या भागात काश्मिरी पंडितांचे वास्तव्य होते मात्र पंडित परिवारांना येथून हुसकावून लावले गेले तेव्हापासून या शिवमंदिरात पुजारी नाही.

या मंदिराची जबाबदारी मुस्लीम परिवाराने घेतली आहे. या मंदिराला पुरातत्व विभागाने स्मारक दर्जा दिला आहे. गुलाम नबी शेख हे पुरातत्व विभागात नोकरीला होते. त्यांनी या मंदिराची देखभाल केली आणि आता ते निवृत्त झाल्यावर त्याच्या पुतण्या या मंदिराची काळजी घेत आहे. ते केवळ हे मंदिर स्वच्छ ठेवत नाहीत तर देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना त्याची माहिती सांगतात. १९७४ मध्ये या मंदिराला स्मारकाचा दर्जा मिळाला आणि तेव्हापासून त्याची देखभाल शेख परिवार करत आहे.

पुरातत्व विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि लोककथेनुसार पांडवानी या भागात पाच मंदिरे बांधली होती. त्याला पयार मंदिरे असे नाव होते. मात्र आक्रमणात शत्रूने हि मंदिरे तोडण्याचा प्रयत्न केला. अर्थात पांडवानी त्यांचा पराभव करून मंदिरे वाचविली. पण येथे आक्रमणाची भीती असत होती त्यामुळे कुंती हातात ढोल घेऊन मंदिराचे रक्षण करत असे आणि शत्रू दिसला कि ढोल वाजवून पांडवांना सावध करत असे. एकदा मात्र खूपच मोठे आक्रमण झाले तेव्हा येथील चार मंदिरे पांडवानी दुसरीकडे हलविली, हे मंदिर मात्र येथेच राहिले. त्यावेळी हे मंदिर लुटले गेले असे सांगतात.

Leave a Comment