कोलंबियातील बॅरेन्क्वील कार्निवल उत्साहात सुरु

carnival
जगातील दोन नंबरचा सर्वात मोठा कार्निवल बॅरेन्क्वीलची सुरवात कोलंबियात मोठ्या उत्साहात झाली असून या कार्निवलमध्ये यंदा ६ लाख लोक सहभागी झाले आहेत. युनेस्कोने २००३ मध्ये या कार्निवलला मास्टरपीस ऑफ द इन्टँन्जीबल हेरीटेज ऑफ ह्युमॅनिटी अशी मान्यता दिली आहे.

या महोत्सवात फुलांनी नटलेले कलाकार हे मुख्य आकर्षण आहे. कोलंबियात १ हजार दिवस चाललेले युद्ध संपल्याचा आनंदाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. हे युद्ध संपल्यावर बॅरेन्क्वील लोकांनी एकत्र जमून परेड काढली आणि युद्ध समाप्तीचा आनंद व्यक्त केला. यात मुख्य दिवशी बंदुकीच्या गोळ्यांऐवजी एकमेकांना फुले मारून लढाई खेळली जाते. शनिवारी हे फुल युद्ध साजरे झाले.

यंदा लोकनृत्यात १०० समूहाचे १२ हजार नर्तक नर्तकी सामील झाले होते. या शहराचा जिवंतपणा दाखविण्यासठी राणी कॅरोलीना सेजेबरे अबुदिनेन फुलांनी सजविलेल्या गोल्डन सिटी रथातून शहराचा दौरा करते. हा महोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी लोटते.

Leave a Comment