रविंद्र जडेजाच्या पत्नीचा भाजप प्रवेश

riva-jadeja
गुजरातचे कृषीमंत्री आर.सी फालदू आणि खासदार पूनम मदम यांच्या उपस्थितीत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजाने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
riva-jadeja1
उद्योगपती आणि कंत्राटदार हरदेव सिंह सोळंकी यांची रिवाबा ही एकुलती एक मुलगी असून त्यांच्या स्वत:च्या २ खासगी शाळा आणि एक हॉटेल आहे. त्याचबरोबर रिवाबाचे काका हरिसिंह सोळंकी हे गुजरातमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. रिवाबाची आई प्रफुलब्बा राजकोट येथे रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.

१७ एप्रिल २०१६ साली रिवाबाने भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजासोबत लग्न केले होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची रिवाबा पदवीधर असून तिने युपीएससी परीक्षेचा अभ्याससुद्धा केला होता. गेल्या वर्षी पोलीस कॉन्स्टेबल सोबत झालेल्या मारहाणीनंतर रिवाबा चर्चेत आली होती. गेल्या वर्षी रिवाबाने रजपूत करणी सेनेतही प्रवेश केला होता.

Leave a Comment