शांततेचा नोबेल माझ्या ऐवजी त्या व्यक्तिला द्या – इम्रान खान

noble
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने भारताच्या स्वाधीन केले. भारताने पाकिस्तानविरोधात वापरलेल्या कुटनितीचा दबाव या प्रकरणी कामी आल्यानंतर अभिनंदन भारतात दाखल झाले. या साऱ्या घडामोडीनंतर पाकिस्तानच्या संसदेमध्ये प्रस्ताव पंतप्रधान इम्रान खान यांना ‘शांततेचा नोबेल पुरस्कार’ दिला जावा याकरिता सादर करण्यात आला. आता इम्रान खान यांनी त्यावर नोबेल पुरस्कार मला न देता काश्मीरचा मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तिला दिला जावा असे मत मांडले आहे.

पाकिस्तानच्या एफ – 16 विमानाला भारतीय हवाई दलाच्या मिग-21 विमानाने पडले. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पॅराशूटच्या साहाय्याने पाकिस्तानतच्या हद्दीत उतरले. त्यांना तेव्हा पाकिस्तानने ताब्यात घेतले. पण, त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तराच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव टाकताच अभिनंदन यांच्या सुटकेचा निर्णय घेतला. इम्रान खान यांनी संसदेमध्ये भाषणादरम्यान शांततेसाठी आम्ही पाऊल टाकायला तयार असल्याचे म्हटल्यानंतर त्यांना नोबेल पुरस्कार दिला जावा असा मत प्रवाह पाकिस्तानमध्ये तयार झाला आहे.

Leave a Comment