हँडसम हंकसोबत लीप लॉक करण्यासाठी तमन्ना तयार ! - Majha Paper

हँडसम हंकसोबत लीप लॉक करण्यासाठी तमन्ना तयार !

tamana-bhatia
बाहुबली चित्रपटाच्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया लोकप्रिय आणि प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यापूर्वी तिला याक्षेत्रात काही विशेष ओळख मिळाली नव्हती. बाहुबलीच्या यशानंतर तमन्ना आता चित्रपटांची निवडही चोखंदळपणे करताना दिसते. त्याचबरोबर चित्रपटात काम करण्याआधी तिच्या काही अटी असून त्यातली एक अट म्हणजे ती चित्रपटामध्ये किसिंग सीन देणार नाही असा करार करते. पण आता ती आपला करार बॉलीवूडच्या एका हँडसम अभिनेत्यासाठी तोडण्यास तयार झाली आहे.

जगभरात बॉलीवूडचा हँडसम हंक म्हणजेच ऋतिक रोशनचे अगणित चाहते आहेत. आता त्याच्या या चाहत्यांच्या यादीत अभिनेत्री तमन्नाचा देखील समावेश झाला आहे. त्यातच तिने एका एका चॅट शोच्या दरम्यान आपल्याला जर ऋतिकसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली तर चित्रपटात चुंबन न घेण्याचा करार मोडण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

कोणत्याही चित्रपटात किसिंग देणे माझ्या तत्वात बसत नसल्यामुळे मी करार करतानाच हे सीन देणार नसल्याचे स्पष्ट करते. पण अनेक वेळा मी माझ्या सहकाऱ्यांना मस्करीमध्ये हृतिक रोशनसोबत काम करण्याची संधी मिळाली तर हे सीन देईन असे म्हणत असते. दरम्यान, तमन्नाने काही दिवसापूर्वीच हृतिकची भेट घेतली होती. या भेटीवेळी तमन्ना प्रचंड खूश होती.

Leave a Comment