हे देश जगभर विकताहेत घातक हत्यारे

weapons
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्चने २०१७ साली ट्रेड इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्स्फर संदर्भात प्रकाशित केलेल्या अहवालानुसार जगातील १० देश प्रामुख्याने शस्त्र निर्यातीत आघाडीवर असून आयातदार देशांची संख्या आता ४० पेक्षा अधिक आहे. शीत युद्ध समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय शस्त्र हस्तांतरण वेगाने वाढले आहे.

शस्त्रनिर्यातदार देशात अमेरिका अर्थातच आघाडीवर असून हा देश जगभरातील ९८ देशांना घातक शास्त्रे विकतो आहे. त्यात आयातदार देशात सौदी, युएइ आणि ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ फ्रांस देशाचा निर्यातीत नंबर असून हा देश ८१ देशांना शस्त्रे पुरवितो आणि इजिप्त, चीन, भारत हे मोठे खरेदीदार आहेत. रशिया ४७ देशांना शस्त्रविक्री करतो आणि त्यांचे सर्वात मोठे ग्राहक भारत, चीन, व्हिएतनाम हे देश आहेत. चीन ४८ देशांना हत्यारे विकतो त्यात पाकिस्तान, बांगलादेश, अल्जिरीया हे त्याचे प्रमुख खरेदीदार देश आहेत.

नेदरलंड जॉर्डन, इंडोनेशिया देशांना हत्यारे पुरवितो तर इस्रायल भारत, अझरबैजान, व्हिएतनाम या देशांना शस्त्रे विकतो. स्पेन ऑस्ट्रेलिया, तुर्की, सौदी देशांना तर युके सौदी, ओमान, इंडोनेशिया देशांना शस्त्रपुरवठा करतो. इटली युएइ, तुर्कस्तान, अल्जेरिया देशात सर्वाधिक निर्यात करतो असे हा अहवाल सांगतो.

Leave a Comment