वाराणसी येथील तीलभांडेश्वर मंदिर

shivling
आज महाशिवरात्र. देशभरातील हजारो शिवमंदिरात आज महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. वाराणसीमधील विश्वनाथ मंदिर जसे त्याला अपवाद नाही तसेच या शहरात असलेले एक विशेष मंदिरही त्याला अपवाद नाही. वाराणसीच्या सोनापूर भागात एका गल्लीत असलेले तीलभांडेश्वर महादेव मंदिर प्राचीन तर आहेच पण येथील शिवलिंग दररोज तीळा तीळाने वाढते असे सांगतात. हे शिवलिंग स्वयंभू आहे.

tilbhand
असे सांगतात मोगल शासन काळात हे शिवलिंग फोडण्याचे अनेक प्रयत्न केले गेले मात्र त्यात यश आले नाही. उलट दरवर्षी हे लिंग तीळा तीळाने वाढते आहे. ब्रिटीश काळात एका अधिकाऱ्याने या समजुतीत काही तथ्य आहे काय हे पाहण्यासठी या शिवलिंगाभोवती धागा गुंडाळला तेव्हा तो दुसरे दिवशी तुटला होता असे सांगतात. असेही सांगतात की या भागात पूर्वी तीळाची शेते होतो. त्यात एक दिवस अचानक शिवलिंग प्रकट झाले. तेव्हापासून या शिवलिंगावर बेलाप्रमाणे तीळ वाहिले जातात. असाही समज आहे की हे शिवलिंग मकरसंक्रांति दिवशी तिळाच्या आकाराचे भासते. श्रावणात येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

Leave a Comment