पाकिस्तानने परत केले नाही अभिनंदनचे पिस्तुल

pistol
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या तावडीतून सुटून भारतात २७ फेब्रुवारीला रात्री सुखरूप परतले असले तरी त्याच्या काही वस्तू पाकिस्तानने परत केलेल्या नाहीत. भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी एफ १६ विमानाला हुसकून लावण्यासाठी अभिनंदन यांनी मिग २१ मधून चढविलेल्या हल्ल्यात एफ १६ कोसळले तसेच अभिनंदन यांचेही मिग २१ कोसळले. पॅराशूटने उतरताना अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यावर त्यांना पकडले गेले आणि ६० तासानंतर त्यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले होते.

पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात सापडण्यापूर्वी अभिनंदन याच्यावर स्थानिक लोकांनी हल्ला चढविला होता मात्र अभिनंदन यांनी हवेत गोळीबार करून जवळच्या तलावात उडी घेतली आणि जवळचे महत्वाचे कागद पाण्यात बुडविले असे समजते. तरीही त्यांच्याजवळ पिस्तुल, चष्मा, अंगठी, घड्याळ आणि काही कागदपत्रे होती असे समजते. पाक लष्कराने अभिनंदन यांची कसून चौकशी केली. अभिनंदन यांना भारतात परत पाठविताना त्यांची अंगठी, घड्याळ, चष्मा परत दिला गेला मात्र त्यांची पिस्तुल परत दिले गेलेले नाही.

Leave a Comment