कावासाकी निन्जा एच २ आर, भारतात एकमेव डिलिव्हरी

h2r
जगातील पहिली फोरस्ट्रोक सुपरचार्ज मोटारसायकल असल्याचा दावा करणाऱ्या जपानी कावासाकीने त्याच्या नव्या निन्जा एच २ आरची भारतात पहिली डिलिव्हरी दिली आहे. या वर्षात हि एकच मोटरसायकल भारतात एकाच ग्राहकाला दिली गेली असून या बाईकची किंमत आहे ७२ लाख रुपये.

इंडिया कावासाकी मोटारसायकल प्रा. लिमी.चे व्यवस्थापकीय संचालक नओकी मात्सुमोटो म्हणाले आमच्या या मोटारसायकलने जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही गाडी फक्त मोटारसायकल सुपरचार्जरनेच चार्ज होते. त्यामुळे हीटगेन कमीतकमी होते आणि इंटरकुलरची गरज राहत नाही. ही लीगल बाईक नाही म्हणजे ती सार्वजनिक रस्त्यावर चालविता येणार नाही कारण त्याला रजिस्ट्रेशन नंबर नाही. या मोटारसायकलला ९९८ सीसीचे चार सिलिंडर इंजिन आणि ६ स्पीड गिअर बॉक्स दिला गेला आहे.

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याच्याकडे निन्जा एच २ ची मोटारसायकल आहे. निन्जा एच २ आर हे त्यापुढचे मॉडेल आहे.

Leave a Comment