तरुणाईत आता अभिनंदन मिशीची क्रेझ

misha
विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले तेव्हा त्यांची बहादुरी हा जसा सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला तसेच अभिनंदन यांची आणखी एक स्टाईल अशीच व्हायरल झाली असून तरुणाई मध्ये या स्टाईलची विशेष क्रेझ दिसते आहे. ही स्टाईल म्हणजे अभिनंदन यांची मिशी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिणेत सुपरस्टार रजनीकांत याच्या पेट्टा चित्रपटातील तसेच सूर्या यांच्या सिंघम चित्रपटातील त्यांच्या मिश्या अश्याच पुरुष वर्गात वेगाने लोकप्रिय झाल्या होती. अभिनंदन ही दक्षिणात्य आहेत त्यामुळे या राज्यात त्यांची दाढी कम मिशी अशीच लोकप्रिय ठरली असून अनेक तरुण त्याबरहुकुम स्वतः मिशी ठेऊ लागले आहेत. या भागातील सलून मधून अभिनंदन मिशी स्टाईलची आवर्जून ग्राहक फर्माईश करत आहेत.

काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा कप्तान विराट, फलंदाज शिखर धवन तसेच बाजीराव मस्तानीचा हिरो रणवीरसिंग यांची दाढी स्टाईल तरुण वर्गात लोकप्रिय ठरली होती. विशेष म्हणजे कित्येक पिढ्यांपासून हवाई दल, लष्कर सेवेतील जवानांच्या मिश्या विशिष्ठ स्टाईलने राखल्या जातात किंबहुना ती त्यांची विशेष ओळख असते. डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये मिशी हि जणू त्यांची उपसंस्कृती मानली जाते. अभिनंदन यांनी दाखविलेल्या अतुल शौर्यामुळे त्यांची स्टाईल लोकप्रिय झाली तर त्यात नवल नाही.

Leave a Comment