भारतात लवकरच एंट्री करणार ‘ब्लॅक शार्क’

Xiaomi
शाओमीच्या मालकीची असलेली आणि गेमिंग स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असलेली ब्लॅक शार्क ही कंपनी लवकरच भारतात एंट्री करणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भारतातील बंगळुरूमध्ये ब्लॅक शार्क कंपनी ऑफिस सुरू करणार असल्याचे समजते.

शाओमीने नुकतेच २ नवीन स्मार्टफोन्स रेड मी 7 आणि रेड मी 7 Pro लाँच केले. आता लवकरच कंपनी गेमिंग स्मार्टफोनही भारतीय बाजारात लाँच करणार असल्याचे वृत्त आहे. बंगळुरूमध्ये कंपनीचे हेडक्वार्टर असणार आणि कंपनी तिथूनच सर्व व्यवहार सांभाळणार असल्याचे वृत्त आहे.

याबाबत माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॅक शार्कमध्ये 5.99 इंचीचा एलसीडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन क्वालकॉम 845 चिपसेट प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी एड्रिनो 630, अॅड्रॉईड ओरिओ 8.0 ऑपरेटिंग सिस्टम, 6GB आणि 8 GB रॅम ऑप्शन्स आणि – 64 GB आणि 128 GB मेमरी, प्रायमरी सेंसर 12 मेगापिक्सेल, सेकेंडरी सेंसर 20 मेगापिक्सेल तर सेल्फी कॅमेरा (20 मेगापिक्सेलचा सिंगल सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4,000 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.

Leave a Comment