बँक खात्याशी पॅनकार्ड लिंक केलेल्यांनाच मिळणार हा फायदा

pancard
आयकर विभागाचा IT विभाग 1 मार्चपासून आता ई-मोडच्या माध्यमातून रिफंड जमा करणार असून पण फक्त त्याच लोकांना हा रिफंड मिळणार आहे ज्यांनी आपले पॅनकार्ड बँक खात्याशी जोडले आहे.

तुम्ही जर तुमचे पॅनकार्ड अद्यापही तुमच्या बँक खात्याशी जोडले नसेल तर या रिफंडचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन महत्वाची कागदपत्र जमा करावी लागणार आहेत.

ग्राहकाचे बँक खाते आयकर विभागाकडून आलेल्या सूचनेनुसार पॅनकार्डला जोडणे अनिवार्य आहे. कारण आतापर्यंत चेकद्वारा जमा होणारा रिफंड यापुढे करदात्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार.

आयकर विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, ज्या करदात्यांनी आपले बँक खाते पॅनकार्डला जोडलेले नाही ते आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जाऊन पॅनकार्ड लिकं करू शकतात.

Leave a Comment