पाकड्यांकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, तीन नागरिक ठार

pakistan
श्रीनगर – आज वारंवार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील क्रिष्णा घाटी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात ३ स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुंछचे एसएसपी आर.के.आंग्रल यांनी दिली.

काल पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताच्या ताब्यात दिले. संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागलेले होते. मात्र, पाकिस्तानकडून अशात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. उरी येथील गवाहालन, चौकस, किकेर आणि काठी येथे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने २७ फेब्रुवारीलाही उरी येथे गोळीबार केला होता. उरी बारमुल्ला जिल्ह्यात असून नियंत्रण रेषेपासून अगदी जवळ आहे.

तसेच जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) २ पोलिसांना वीरमरण आले, तर २ पोलीस, २ सीआरपीएफचे जवान आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.

Leave a Comment