‘आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत’

abhinandan-vardhman1
चेन्नई : आठ वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या काही वैमानिकांना लढाऊ विमानाच्या पायलटचा अॅटिट्यूड कसा पाहिजे कसा पाहिजे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सर्व वैमानिकांनी ‘गुड’ अॅटिट्यूड असे उत्तर दिले होते. पण त्यात एका असा वैमानिक होता ज्याने ‘बॅड’ अॅटिट्यूड असे उत्तर दिले होते. ते होते आपले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान.

अभिनंदनचा पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता अभिनंदन त्यात ज्या शांतपणे, आत्मविश्वासाने आणि धीराने पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना उत्तर देत होता त्या उत्तरांनी सर्व देश थक्क झाला. अभिनंदने त्यावेळी जवानाला जो निडरपणा, बेडरपणा लागतो तो म्हणजेच बॅड’ अॅटिट्यूड असे समर्थन केले होते. त्याने सर्व देशाला त्याचा प्रत्यय दाखवून दिला.

आता अभिनंदनबाबत आणखी अभिमान वाढवणारी माहिती निवृत्त ग्रुप कॅप्टन तरुण के सिंह यांनी सांगितली आहे. अभिनंदन यांच्यात जी लढाऊ आणि पराक्रमी वृत्ती आली, ती त्याच्या आईकडूनच. सिंह गेल्या अनेक दशकांपासून वर्धमान कुटुंबियांना ओळखतात. अभिनंदन प्रकरणानंतर त्यांनी अभिनंदनची आई डॉ. शोभा वर्धमान यांची ओळख करुन दिली.

भारतीय हवाई दलात अभिनंदनचे वडील एस वर्धमान हे एअर मार्शल होते. तर त्याची एक डॉक्टर होती. त्यांनी डॉक्टर्स विदाउट बॉर्डरर्स (Doctors Without Borders) या संघनेच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील युद्धग्रस्त भागात लोकांवर उपचार करण्याचे काम केले. अगदी इराकपासून ते हैती यादवीपर्यंत, युद्ध आणि हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या भागात त्यांनी लोकांची सेवा केली.

अशा हिंसाचारग्रस्त भागातील लोकांची सेवा करणे, त्यांच्यावर उपचार करणे हे प्रत्यक्ष युद्धभूमीत लढण्यासारखेच मोठे आहे. पण अतिशय धैर्याने आणि शौर्याने त्यांनी त्या भागात जाऊन, तिथे राहून लोकांना मदत केली. याबाबत सिंह पुढे सांगतात की, लहानपणापासूनच डॉ. शोभा या अतीशय धाडसी होत्या. लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे शोभा आणि त्यांच्या भावडांना अतिशय खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले आणि त्यामुळेच त्या कणखर झाल्या.

डॉ. शोभा यांनी 2005 मध्ये आयव्हरी कॉस्ट येथे प्रचंड हिंसाचार सुरू असताना अतिशय दुर्गम भागात जाऊन सेवा दिली होता. त्यांनी नायजेरीया, लायबेरीया येथील यादवीनंतर संयुक्त राष्ट्रातर्फे त्या भागात लोकांवर उपचार केले. आखाती युद्धानंतर इराकमधील त्यांचे काम अतिशय जोखमीचे होते. त्या अशा युद्धग्रस्त भागात काम करताना अनेकदा हल्ल्यातून बचावल्या देखील आहेत. पण त्यांनी आपले काम कधी सोडले नाही.

3 लाख जणांचा मृत्यू यादवीने ग्रस्त असलेल्या हैती या देशात भूकंपात झाला होता. त्यांनी आणि त्यांच्या त्यानंतर पथकाने केलेले काम हे अतिशय उल्लेखनीय होते. त्या सध्या लहान मुलांवर लैंग अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी ऑनलाईन मोहिम चालवत आहेत.

Leave a Comment