सौदीने रद्द केले हमजा बिन लादेनचे नागरिकत्व

binladen
सौदी अरेबियाने शुक्रवारी अल कैदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन याचे नागरिकत्व रद्द केले असल्याची घोषणा केली. सौदीच्या म्हणण्यानुसार त्यांनी सरकारी गॅजेटमध्ये या शाही आदेशाची नोंद केली आहे. वास्तविक नोव्हेंबरमध्येच हमजाचे नागरिकत्व रद्द केल्याचे सौदीचे म्हणणे आहे.

अमेरिकेने हमजा बिन लादेन याचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला १० लाख डॉलर्स इनाम देण्याची घोषणा केली आहे. हमजाकडे दहशतवादाचा उभरता चेहरा म्हणून पहिले जात आहे. हमजा याला जिहादचा युवराज असे म्हटले जाते. त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहिती नाही. तो पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरीया मध्ये असावा किंवा इराण मध्ये नजरबंद असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. ३० वर्षीय हमजाने वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याची घोषणा केली असून त्याच्या टार्गेटवर अमेरिका आहे.

Leave a Comment