विवोने सादर केला आयक्यू०० सबब्रांडचा स्मार्टफोन

viviiq
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी विवोने त्याच्या फेब्रुवारीत सुरु केलेल्या सबब्रांड आयक्यूoo चा पहिला स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर सह ट्रिपल कॅमेरा आणि ४४ वॉट सुपरफ्लॅश चार्ज बॅटरी अशी अनेक फिचर त्याला दिली गेली आहेत. ब्लू, रेड कलर मध्ये तो मिळू शकेल.

या फोनसाठी ६.४१ इंची अमोलेद डिस्प्ले, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, १३ + १२ +१२ एमपीचा ट्रीपल रिअर कॅमेरा, १२ एमपीचा फ्रंट कॅमेरा, युएसबी टाईप सी पोर्ट सह ४ हजार एएमएचची बॅटरी दिली गेली असून ती ५० मिनिटात पूर्ण चार्ज होते. गेमिंग संबंधित फिचर ४ डी शॉक दिले गेले आहे. हा फोन चार व्हेरीयंट मध्ये सादर केला गेला आहे. पैकी ६ जीबी १२८ जीबी स्टोरेजची किंमत ३२ हजार, ८ जीबी रॅम १२८ स्टोरेज साठी ३५ हजार, ८ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेजची किंमत ३५ हजार तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजची किंमत ४५ हजार रुपये आहे.

Leave a Comment