विंग कमांडर अभिनंदन अजून काही दिवस युद्धबंदीच

nandan
भारतीय हवाई दलाचे शूर आणि जाबांज पायलट विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या कचाट्यातून सुटून गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वाघा बॉर्डर ओलांडून मायदेशात आल्याचा जल्लोष देशभर साजरा केला जात असला तरी अभिनंदन यांना आणखी काही दिवस युद्धबंदी म्हणून काढावे लागणार आहेत. हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांचे स्वागत केले आहे मात्र आणखी काही दिवस त्यांना त्रास सोसावा लागेल असे समजते.

पाकिस्तानी सेनेच्या ताब्यात अभिनंदन यांनी दोन दिवस काढले आहेत. देशाच्या इन सर्व्हिस कायद्याप्रमाणे अभिनंदन याची कसून चौकशी होईल. हवाई दलाचे इंटेलिजन्स अधिकारी हि चौकशी करतील. त्यामुळे मायदेशी परतल्यावर त्यांना प्रथम रुग्णालयात दाखल करून त्यांची कसून शारीरिक तपासणी केली जाईल. शत्रूने त्याच्या शरीरात कुठे चीप बसविलेली नाही याची खात्री करून घेतली जाईल. अभिनंदन यांचे ब्रेन वॉशिंग केले गेले काय, त्यांना माहिती काढून घेण्यासाठी काही औषधे दिली गेली काय याची खात्री करून घेतली जाईल आणि मगच ते सेवेत पुन्हा रुजू होतील असे समजते.

हवाई दल अधिकारी म्हणाले, विंग कमांडर अभिनंदन यांनी दाखविलेल्या शौर्यामुळे देशाची मान नक्कीच उंचावली आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. मात्र काही नियम पाळावेच लागतात कारण त्याच्याशी देशाची सुरक्षा निगडीत असते त्यामुळे अभिनंदन याचीही कसून चौकशी केली जाईल.

Leave a Comment