विंग कमांडरच्या सन्मानार्थ बीसीसीआयने लाँच केली जर्सी

jercy
आपल्या मिग २१ विमानाच्या सहाय्याने पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ विमान पाडून आणि शत्रूच्या हाती सापडूनही धैर्याचा परिचय देणारे हवाई दलाचे फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन १ मार्चला रात्री मायदेशी सुखरूप परतल्याचा आनंद सर्व थरातील नागरिक साजरा करत आहेत. याला क्रीडा क्षेत्र अपवाद नाही. बीसीसीआय ने शुक्रवारी टीम इंडियाची नवी जर्सी विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाने लाँच केली असून या जर्सीचा नंबर १ आहे.

विंग कमांडर अभिनंदन भारतात आले त्यावेळीच ही जर्सी सादर करण्यात आली. भारतीय जांबाज वीराच्या सन्मानार्थ ही जर्सी सादर करण्यात येत असल्याचे जाहीर करून अभिनंदन यांचे स्वागत केले गेले. सोशल मिडियावर बीसीसीआयचे यासाठी कौतुक केले जात आहे. क्रीडा क्षेत्रातील सचिन, गंभीर, सेहवाग यांश्यासह अनेक खेळाडूंनी अभिनंदन यांच्या शौर्याला सलाम केला आहे. पहिलवान गीता फोगात हिने गुरुवारी मिग २१ से एफ १६ उडाऊँ, तब अभिनंदन नाम कहांऊँ अश्या ओळी ट्विट केल्या आहेत.

Leave a Comment