व्हॉट्सअॅप आपल्या ‘या’ फिचरमध्ये करणार मोठा बदल

whatsapp
सध्याच्या घडीला तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर तुम्हाला जर फोटो, लिंक, व्हिडिओ किंवा फाईल शोधण्यात अडचण येत असते. पण आता व्हॉट्सअॅप आपल्या सर्च फिचरला आणखी अपग्रेड करत असून याबाबत माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या फिचरचे बीटा टेस्टिंग सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चॅट टॅबमध्ये व्हॉट्सअॅपचे हे फिचर दिसणार आहे. सर्च बारवर तुम्ही टॅप केल्यानंतर तुम्हाला अनेक विकल्प दिसणार आहेत. यामध्ये व्हिडिओज, लिंक्स आणि डॉक्यूमेंट्सचाही समावेश आहे. या विकल्पामधून तुम्ही कोणताही एक विकल्प निवडून सर्च करू शकता. तुम्ही ग्रुप चॅटमधून कोणताही फोटो किंवा फाईल सर्च करू शकता. या शिवाय तुम्ही ऑडिओही सर्च करू शकता. तुम्हाला सर्व चॅट्सचे ऑडिओ दिसणार मात्र ऑडिओ फाईलचा प्रिव्यू दिसणार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या आयओएस प्लॅटफॉर्मसाठी या फिचरला टेस्ट करण्यात येत आहे. या फिचरचा लवकरच आयओएस डिव्हाईस रोल आउट करण्यात येणार. हे फिचर येत्या काळात अँड्रॉईड डिव्हाईसमध्येही उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअॅपने सध्या पहिल्या बायोमॅट्रिक फिचरला आयओएस युजर्ससाठी रोलआउट केले होते. व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट व्हर्जनसोबत या फिचरला वापरता येते. सध्या हा फिचर अँड्रॉईड युजर्ससाठी रोलआउट करण्यात आलेला नाही.

व्हॉट्सअॅपमध्ये यावर्षी अनेक नवे फिचर्स जोडणार आहेत. यामध्ये डार्क मोड, ग्रुप चॅट फिचर्सचा समावेश असणार आहे. ग्रुप चॅट फिचर्समध्ये मोठे बदल करण्यात येणार असल्याचे समजते. या शिवाय डार्क मोड फिचर्सची युजर्स खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. या फिचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप रात्री वापरताना त्रास होणार नाही. तुम्ही डार्क मोड ऑन करुन याचा वापर करू शकता.

Leave a Comment