गुगल ट्रेंडनुसार पाकिस्तानात मोदी सर्च वाढला

modii
गेल्या सात दिवसात गुगुल ट्रेंड्स मध्ये कोणत्या गोष्टींवर अधिक सर्च केला गेला असता या काळात पाकिस्तान सह जगाच्या अन्य देशात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सर्च वेगाने वाढला असल्याचे दिसून आले आहे. तर भारताने पुलवामा हल्ल्याचा जबाब म्हणून पाकिस्तानातील बालाकोट येथे जैशच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर भारतात सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट, पाकिस्तान या की वर्डवरून सर्च केला जात आहे.

२६ फेब्रुवारीला बालाकोटवर मिराज २००० विमानांनी बॉम्बहल्ले केले आणि जगात सर्वात गुगलवरून याची माहिती गोळा करण्यासाठी खास की वर्ड देऊन सर्च केले गेले. भारतात पाकिस्तान हा की वर्ड सर्वाधिक सर्च केला गेला तर त्यापाठोपाठ सर्जिकल स्ट्राईक, मिराज २०००, पुलवामा, इंडिअन एअर फोर्स, बदला इतकेच नव्हे तर पाकिस्तान टोमॅटो किंमत हा शब्दही सर्च केला गेला. २६ फेब्रुवारीला जगभरात मोदी शब्द सर्वाधिक सर्च झाला. यात अमेरिका, सिंगापूर, कॅनडा, युएइ मधील युजर होते तर सर्वाधिक युजर पाकिस्तानी होते. तुलनेने इम्रानखान हा शब्द युके, सौदी आणि ऑस्ट्रेलियात सर्च केला जात होता.

Leave a Comment