अमेरिका सरकार एका मुलाला शिकवण्यासाठी बांधणार कोट्यवधीची शाळा !

school
सध्याच्या घडीला शिक्षण किती महत्वाचे आहे हे तुम्ही आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. त्याच आशयाशी निगडीत शिकेल तोच टिकेल अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्यालाच अनुसरुन अमेरिकेतील सरकार किती सजग आहे याचे उदाहरण अमेरिकेतील व्योमिंग येथील लारामी शहरात पहायला मिळते. अमेरिकन सरकार याठिकाणी चक्क एक मुलाच्या शिक्षणासाठी एक कोटी रुपये खर्च करुन शाळा बांधणार आहे.
school1
अमेरिकेत हे काही नवीन नाही. कारण यापूर्वी देखील तेथील लारामी शहरात १५ वर्षांआधी म्हणजेच २००४ मध्ये केवळ एका विद्यार्थ्यासाठी शाळा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, विद्यार्थी आणि मुलांसाठी ही शाळा फार अनोखी आहे. कारण येथे त्यांना त्रास द्यायला कुणीही येत नाही. त्याचदरम्यान ही शाळा सुरु करण्यामागचे एक कारण समोर आले आहे. लारामीमधील हा परिसर जास्तीत जास्त डोंगराळ भाग आहे. त्यासोबतच व्योमिंगच्या कायद्यानुसार, रहिवाशी परिसरात दूर राहणाऱ्या मुलांना जास्त लांब असलेल्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात नाही.
school2
लारामीमध्ये डोंगराळ भाग असल्या कारणाने रस्त्यांची स्थिती फारच वाईट असल्यामुळे येथील मुलांना घेऊन येणे किंवा दूर शाळेत घेऊन जाणे फार कठीण आणि जोखमीचे आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. पण शिक्षकाच्या गैरहजेरीत विद्यार्थ्यांना शिकवणे फार कठीण आहे. फार पूर्वीपासून या परिसरात एका शाळा आहे. कोजी हॉलो एलिमेंट्री स्कूल असे या शाळेचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी ही शाळा २४० विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार तयार करण्यात आली होती. पण २००४ पासून ही शाळा पूर्णपणे बंद आहे.

Leave a Comment