भारताने दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला साथ द्यावी – वसीम अक्रम

wasim-akram
जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात आपले 40 हून अधिक जवान शहिद झाले होते. त्याचाच वचपा काढण्यासाठी मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 विमानांनी पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले. त्यात 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर गुरुवारी पाकिस्तानकडून या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात आले. त्याचबरोबर आज देखील पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांत सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रमने दोन देशांतील परिस्थितीवर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण आहे. या परिस्थितीवर अक्रम म्हणाला, भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शत्रू नाहीत. भारत व पाकिस्तान यांचा शत्रू एकच आहे आणि हे समजण्यासाठी आपण आणखी किती दिवस एकमेकांचे रक्त वाहणार आहोत? दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन लढायला हवं. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी भारतीयांनी पाकिस्तान साथ दिली पाहिजे.

Leave a Comment