एका अमेरिकन व्यक्तीसह फक्त 8 लोकांना होती एरियल स्ट्राईकची माहिती

aerial-strike
जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात आपले 40 हून अधिक जवान शहिद झाले होते. त्याचाच बदला काढण्यासाठी मंगळवारी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांवर हल्ले केले. त्यात 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

जगातील फक्त 8 लोकांनाच अत्यंत गुप्तपणे करण्यात आलेल्या या हल्ल्याची माहिती होती. यापैकी एक व्यक्ती अमेरिकन होती ज्याला 26 फेब्रुवारीला हवाई दल हल्ला करणार असल्याचे माहिती होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पुलवामा हल्ल्यानंतर एक गुप्त बैठक पार पडली होती. बालाकोट हल्ल्याची योजना त्यातच तयार करण्यात आली.

या हल्ल्याची योजना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आखली होती. त्यांनी भारताचे गुप्तहेर म्हणून काम केले आहे. त्यांची सर्जिकल स्ट्राईक करण्यात महत्वपूर्ण भूमिका होती. पंतप्रधानांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत अजित डोवाल यांच्यासोबत रॉ प्रमुख अनिल धमासाना देखील उपस्थित होते. पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांची माहिती रॉ कडून घेण्यात आली.

रॉसोबत राहून संशयित ठिकाणांची माहिती गुप्तचर विभागाचे प्रमुख राजीव जैन यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. तसेच जैशच्या हालचालींवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भारताने 2016 मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कराने जिगरबाज कामगिरी केली होती. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हेदेखील उपस्थित होते.

एरियल स्ट्राईकचे संपूर्ण श्रेय एअरचीफ मार्शल बिरेंदर सिंह धनोवा यांना जाते. या हल्ल्याची माहिती सर्वात आधी त्यांनाच होती. या बैठकीत नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा हेसुद्धा उपस्थित होते. सागरी हल्ल्यांची शक्यता असल्याने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात नौदलाची महत्वाची भूमिका असते. भारतातील या अधिकाऱ्यांशिवाय अमेरिकेच्या एनएसए प्रमुखांना याची माहिती होती. एरियल स्ट्राईकच्या एक दिवस आधी अजित डोवाल यांनी अमेरिकेचे एनएसए प्रमुख जॉन बोल्टन यांना माहिती दिली होती.

Leave a Comment