भारतीय विंग कमांडरची उद्या होणार घरवापसी – इम्रान खान

abhinanadan-vardhman
नवी दिल्ली – भारताने पाकच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सुखरुप सोडवण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानने कोणतीही चर्चा न करता आमच्या पायलटला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी उद्या भारतीय विंग कमांडर यांना भारतात पाठवले जाईल असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तातडीने भारतामध्ये पाठवावे. कोणतीही देवाणघेवाण अभिनंदन प्रकरणावरुन केली जाणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची तडजोड या प्रकरणामध्ये होईल आणि चर्चेचा पत्ता आपल्या हातात असल्याचे पाकिस्तानला वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे. अभिनंदन यांना पाकिस्तानकडून चांगली वागणूक दिली जावी अशी भारताची अपेक्षा असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती.

Leave a Comment