संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याचा दावा: विंग कमांडराला पाककडून वाईट वागणूक

ABHINANDAN
नवी दिल्ली – संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत पाकने वाईट व्यवहार केल्याचा दावा केला आहे. अभिनंदन यांना चांगली वागणूक दिल्याचे काही व्हायरल फोटो आणि व्हिडिओंमधून यापूर्वी पाकिस्तानकडून सांगण्यात येत होते. त्यादरम्यान त्याची सत्यता समोर नव्हती आली.

याबाबत माहिती देताना संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले, भारताच्या सैन्य तळांवर पाकिस्तानद्वारे करण्यात आलेला हवाई हल्ला केला. त्याचबरोबर जिनिव्हा कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन करताना भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना वाईट वागणूक दिली आहे.

त्याचबरोबर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानी लष्कर पाठीशी घालत आहे. तसेच मसूद अजहर सारख्या त्याच्या म्होरक्याला पाकिस्तानकडून आपल्या देशात आश्रय दिला जात असल्याचा आमचा ठाम विश्वास आहे, असेही संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment