बालाकोट उध्वस्त होत असताना जन्माला आला मिराजसिंग

mirage
पुलवामा हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाची मिराज २००० विमाने जेव्हा पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर आग ओकत होती तेव्हाच म्हणजे मंगळवारी पहाटे ३ वा.५० मिनिटांनी राजस्थानातील रुग्णालयात एका नवजात बालकाने पहिले टॅह्या केले आणि हवाई दलाच्या या विमानांच्या योगदानाचे स्मरण म्हणून या बाळाचे नाव मिराज ठेवले गेले.

विशेष म्हणजे हे बाळ, मिराजसिंग राठोड सैनिक परिवारात जन्माला आले आहे. बाळाचे आजोबा हवाई दलात असून नैनिताल येथे पोस्टेड आहेत. त्यांना जेव्हा नातवाच्या जन्माची बातमी मिळाली तेव्हा त्यांनीच मिराज नाव ठेवावे असे सुचविले असे समजते. नागोर जिल्यातील दाबडा गावात हे बाळ जन्मले. त्याच्या वडिलांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या बलिदानाचा बदला घेतला जात असताना आमचे बाळ जन्मले याचा अभिमान वाटतो असे सांगताना मोठेपणी त्यानेही भारतीय लष्करात देशसेवा करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Leave a Comment