नुबियाचा वेअरेबल अल्फा स्मार्टफोन सादर

nubia
मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये हुवाई, सॅमसंग कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन सादर केले असताना झेडटीइ चा सबब्रांड नुबियाने एक पाउल पुढे टाकताना वेअरेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. अल्फा या नावाने आलेला हा स्मार्टफोन स्मार्टवॉच प्रमाणे मनगटावर बांधता येतो.

या फोनला ४ इंची फ्लेक्सिबल ओएलइडी डिस्प्ले दिला गेला असून तो दोन व्हेरीयंट मध्ये आहे. पैकी एक ब्ल्यू टूथ आणि दुसरा इ सीम आहे. ब्ल्यू टूथ व्हेरिंयटमध्ये तो स्मार्टफोनशी कनेक्ट करून वापरता येतो तर इ सीम साठी ४ जी सपोर्ट दिला गेला आहे. १ जीबी रॅम, ८ जीबी स्टोरेज, फोटो साठी ५ एमपीचा रिअर कॅमेरा असून फोनला फ्रंट कॅमेरा नाही. फक्त कामापुरता वापर केला तर या फोनची बॅटरी दोन दिवस पुरते असा कंपनीचा दावा आहे.

या फोनची किंमत ४४९ पौंड म्हणजे ३६ हजार रुपये असून तो फक्त युरोप आणि उत्तर अमेरिकेत एप्रिल पासून विक्रीसाठी सध्या उपलब्ध केला जाणार आहे.

Leave a Comment