जपानच्या आओमोरीत पाहावे तिकडे बर्फच

aaomojapan
जगातील सर्वाधिक हिमवृष्टी होत असलेल्या शहरात जपानच्या आओमोरी शहराचा समावेश आहे. यंदा तेथे तुफान हिमवर्षाव होत असून आत्ताच २१ फुट म्हणजे जवळजवळ दोन मजली इमारतीच्या उंचीइतके बर्फ साठले आहे. बर्फ हटविण्यासाठी १२० सदस्य असलेली टीम अहोरात्र काम करत आहे. या काळात येथे हिमवृष्टी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि बर्फावरचे अनेक खेळ येथे खेळले जातात.

aaomori
या गावाची लोकसंख्या ३० हजार असून गेल्या वर्षी असेच साठलेले बर्फ हटविण्यासाठी सरकारला ३.५ कोटी डॉलर्स म्हणजे २४८ कोटी रुपये खर्च करावे लागले होते. दरवर्षी नोव्हेंबर पासून येथे हाडे गोठविणारी थंडी आणि हिमवृष्टी होते. याला सी इफेक्ट स्नो असे म्हटले जाते. एप्रिल पर्यंत हिमवर्षाव होत राहतो..

पर्यटक येथे जाण्यासाठी टोक्योपासून हायस्पीड ट्रेनचा प्रवास करतात. हे अंतर ३ तासांचे आहे. विशेष म्हणजे आओमोरी शहराला विमानतळ आहे पण हिमवर्षाव होत असताना तो बरेचदा बंद ठेवावा लागतो.

Leave a Comment