जगातील टॉप टेन श्रीमंतात मुकेश अंबानी

mukesh
हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०१९ च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यादीत भारतातील उद्योजक रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना टॉप टेन मध्ये आठव्या क्रमांकाचे स्थान दिले गेले असून टॉप टेन मध्ये सामील झालेले ते एकमेव आशियाई आहेत. अंबानी यांची संपत्ती ५४ अब्ज डॉलर्स असून ती टेलिकॉम, उर्जा क्षेत्रातून आली आहे असे या अहवालात म्हटले गेले आहे.

या यादीत अमेझोनचे जेफ बेजोस सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांकावर असून त्याच्या मागोमाग बिल गेट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर वारेन बफेट असून नंतर फ्रांसचे बर्नाट, मार्क झुकेर्बर, मेक्सिकोचे कार्लोस सलीम, स्पेनचे अर्मानिको ओर्तेगा यांचा समावेश आहे. अंबानी आणि अमेरिकेचे सर्जोई हे आठव्या स्थानावर आहेत.

विशेष म्हणजे अंबानी परिवाराच्या वाटण्या झाल्यावर गेल्या सात वर्षात मुकेश यांची संपत्ती ३० अब्ज डॉलरने वाढली आहे तर त्यांचे बंधू अनिल यांची संपत्ती ५ अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. गतवर्षीच्या या यादीतून यंदा ४३० अब्जाधीश बाहेर गेले आहेत त्यात २१३ चीनी आहेत. भारताचे ५२, अब्जाधीश या यादीत यंदा नाहीत. तसेच नव्या यादीत २०१ नवे चेहरे सामील झाले असून त्यात चीनचे ५२, अमेरिकेचे ३९, भारताचे २३ अब्जाधीश आहेत.

Leave a Comment