कोण आहेत विंग कमांडर अभिनंदन?

ABHINANDAN
भारतीय हवाई दलातील पायलट विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानी सेनेच्या ताब्यात असल्याचे व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी भारत सरकारने सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान अभिनंदन यांचे अनेक व्हिडीओ प्रसारित केले जात असून एका व्हिडीओ मध्ये ते नाव अभिनंदन वर्थमान आणि सर्विस क्रमांक २७९८१ असे सांगताना दिसत आहे. या पुढच्या प्रश्नांना ते मी फक्त इतकीच माहिती देऊ शकतो असे सांगत आहेत.

बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेल्या बॉम्बफेकीनंतर पाकिस्तानी हवाई दलाची दोन विमाने भारतीय हद्दीत घुसखोरी करून आल्यावर त्यांना पिटाळून लावताना भारतीय हवाई दलाचे मिग २१ बायसन विमान पाक हद्दीत पडून पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना पाक सेनेने ताब्यात घेतले आहे. अभिनंदन याचे वडील हवाई दलातून एअर मार्शल पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांना परमविशिष्ट सेवा मेडलने गौरविले गेले होते. आई डॉक्टर आहे तर भाऊ हवाई दलात आहे. अभिनंदन विवाहित असून सध्या त्यांचे पोस्टिंग श्रीनगर येथे आहे.

अभिनंदन दुसऱ्या एका व्हिडीओ मध्ये चहा घेताना दिसत असून तेथे ते पाक सेनेने अतिशय चांगली वागणूक दिल्याचे सांगताना दिसत आहेत. आणखी एका व्हिडीओ मध्ये ते डोळ्यावर पट्टी बांधलेले आणि चेहऱ्यावर रक्त अश्या अवस्थेत दिसत आहेत. अभिनंदन यांनी चौकशीत फक्त दक्षिण भारताचा रहिवासी असल्याचे आणि हिंदू असल्याची माहिती दिली आहे. अभिनंदन याच्या वडिलांना भेटण्यासाठी पत्रकार गेले तेव्हा त्यांनी भेटीस नकार देऊन कोणतीची माहिती देऊ शकत नाही असे सांगितले असल्याचे समजते.

Leave a Comment