आली शानदार तिचाकी इलेक्ट्रिक कार साँडोर्स

sondors
अमेरिकेतील नव्याने सुरु झालेल्या साँडोर्स या कार उत्पादक कंपनीने टेस्लाच्या प्रस्थापित इलेक्ट्रिक कार्सना टक्कर देऊ शकेल अशी इलेक्ट्रिक कार मॉडेल साँडोर्स या नावानेच बाजारात आणली आहे. युनिक डिझाईनची ही इलेक्ट्रिक कार तीनचाकी असून त्याची दोन चाके पुढे तर मागे एक चाक आहे. फ्रंटव्हील ड्राईव सिस्टीमच्या या कारमध्ये पुढे दोन तर मागे एक प्रवासी बसू शकतो.

sondors1
ही कार तीन रेंजमध्ये आहे. एक रेंज सिंगल चार्ज मध्ये ८० किमी, दुसरी सिंगल चार्ज मध्ये १६० किमी तर तिसरी ३२१ किमी अंतर कापेल. या कारसाठी लिथियम आयन बॅटरी असून ती रेग्युलर चार्जिंग पॉइंटवर चार्ज करता येते. ० ते ९६ किमीचा वेग ती ५ सेकंदात घेते. कारसोबत ६ टूल्स दिली गेली असून कार खराब झाली तर या टूल्सच्या सहाय्याने रिपेअर करता येते. तसेच साँडोर्स अॅपच्या माध्यमातून सर्विसिंग करता येते. पांढरा, काळा, सिल्वर आणि लाल अश्या चार रंगात ती मिळणार आहे.

या कारची खरेदी ऑनलाईन वरून करता येईल आणि कार होम डिलिव्हर केली जाणार आहे. कारची किंमत ७ लाख १० हजार रुपये आहे. ही कार आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Leave a Comment