भारतीय लष्करी सामर्थ्यापुढे पाकचा लागणार नाही निभाव

indian-army
भारतीय हवाई दलाने काल पाक व्याप्त काश्मिरमध्ये घुसून केलेल्या एरियल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान कमालीचे तणावाचे वातावरण असून सध्याच्या घडीला या घडामोडींवर सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आता त्याला पाकिस्तानकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली असल्यामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या सामर्थ्यापुढे पाकिस्तानी लष्कराचा निभाव लागू शकत नाही. हे आपल्या देशातील प्रत्येकालाच माहित आहे.
indian-army1
1947, 1964, 1971 आणि 1999मध्ये यापूर्वी दोन्ही देशांत युद्धे झाली. भारताने यात चारही वेळा पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय सैन्य जगातील सर्वशक्तीशाली पाच सैन्यांमध्ये सद्यस्थितीत चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान भारताकडे 13 लाख सैनिक आहेत तर त्याच्या तुलनेत पाकिस्तानकडे फक्त 6 लाख सैनिकांची कुमक आहे. तसेच भारताकडे 6464 रणगाडे आहेत तर पाकिस्तानकडे 2924 रणगाडे आहेत.
indian-army2
भारतीय लष्कराच्या ताफ्यात अत्याधुनिक सुपरसोनिक क्रूझ मिसाईल ब्रम्होस, अग्नि, पृथ्वी, आकाश आणि नाग यासारख्या अत्याधुनिक मिसाईल्सचा समावेश आहे. अग्नि ५ ही भारताचे सर्वात अत्याधुनिक आणि घातक मिसाईल आहे. या इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलची मारक क्षमता ५ हजार किलोमीटर आहे. तर पाकिस्ताजवळ घौरी, अबाबील, शाहीन, गझन्वी आणि बाबर यासारखी क्षेपणास्त्रे आहे. बाबरची मारक क्षमता फक्त १ हजार किलोमीटर आहे.
indian-army3
भारतीय हवाई दल जगातील चौथी मोठी वायुसेना असून भारतीय हवाई दलात १ लाख २७ हजार जवान तर पाकिस्तानच्या हवाई दलात ६५ हजार जवानांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ८१४ लढाऊ विमाने दाखल आहेत. त्यातुलनेत पाकिस्तानकडे फक्त 425 लढाऊ विमाने आहेत. त्याचबरोबर एकूण २०८६ विमानासह भारत जगात चौथ्या स्थानी आहे. त्यामध्ये सुखोई एम ३०, मिग -२९, मिग २७, मिग २१, मिराज आणि जगुआर यासारखी आधुनिक विमाने आहे. तर पाकिस्तान ९२३ विमानासह ११ व्या स्थानी आहे. पाकिस्तानकडे चीनी एफ ७, अमेरिकी एफ १६ आणि मिराज विमाने आहेत.
indian-army4
भारतीय नौदलला बाबत बोलायचे झाले तर भारतीय नौदलात ६७ हजार ३५० सैनिक सामील आहेत तर भारताजवळ १०६ पेट्रोल आणि कोस्टल कॉम्बॅट जहाज आहेत. तर पाकिस्तानच्या नौदलात २५ हजार सैनिकांसोबतच ९ फ्रिग्रेट्स, ८ सबमरिन्स आणि १७ पेट्रोल आणि कोस्टल जहाज आहेत. तसेच भारताकडे २७ पाणबुड्या आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त १० पाणबुड्या आहेत. त्याचबरोबर भारताकडे १३० ते १४० अण्वस्त्रे आहेत तर पाकिस्तानकडे १४० ते १५० अण्वस्त्र आहेत.

Leave a Comment